महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
त्रिशूल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४
दूरध्वनी: ०२२-६९३८५९०० | Email ID: contact-secretary@mpsc.gov.in
Website: https://mpsc.gov.in, https://mpsconline.gov.in
Social: @mpsc_office | @official_mpsc
क्रमांक: सीएमए-०४२५/प्र.क्र.१७१/२०२५/जाहिरात
दिनांक: ०६ मे, २०२६
शुध्दीपत्रक
विषय: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
संदर्भ: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६, दिनांक २४ डिसेंबर, २०२५ (जा.क्र.१३२/२०२५)

शासनाकडून प्राप्त गट-अ व गट-ब संवर्गांच्या / सेवांच्या मागणीपत्रानुसार आयोगामार्फत सदर विविध संवर्ग / सेवांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जा.क्र.१३२/२०२५) या संवर्गाच्या एकूण ८७ पदांची जाहिरात दिनांक २४ डिसेंबर, २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.

त्यात महसूल व वन विभागातील महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेचा समावेश करण्यात आला असून पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ या संवर्गाच्या एकूण ०८ पदांचा समावेश करण्यात आला होता.

तथापि, शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांकः एसएफएस-६२३/ प्र.क्र.१२५/फ-८, दिनांक १५ एप्रिल, २०२६ अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार, विज्ञापित ८ पदांपैकी अ.जा. प्रवर्गातील ०१ पद राखीव ठेवण्याचा निर्णय झाला असल्याने, ०८ ऐवजी ०७ पदे भरण्याबाबत कळविले आहे.

त्यानुसार पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे राहील:-

(दोन) महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा (महसूल व वन विभाग): एकूण पदे ०७

(१) पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ (एकूण ०७ पदे)

रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक/समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे :-

प्रवर्ग अ.जा. अ.ज. वि.जा. (अ) भ.ज. (ब) भ.ज. (क) भ.ज. (ड) वि.मा.प्र. इ.मा.व. सा. आणि शै. मागास वर्ग आ.दु.घ. अराखीव पदे एकूण आरक्षित एकूण पदे
पदसंख्या - - - - - - - - - -
(१) सर्वसाधारण - - - - - - - - - -
(२) महिला - - - - - - - - - - -
(३) खेळाडू - - - - - - - - - - - - -
(४) दिव्यांग एकूण ०१ पद - अस्थिव्यंगता / मेंदुचा पक्षघात (Cerebral Palsy) / कुष्ठरोग मुक्त (Leprosy Cured) / शारीरिक वाढ खुंटणे (Dwarfism) / आम्ल हल्लाग्रस्त (Acid Attack Victims) / स्नायु विकृती (Muscular Dystrophy)
(५) अनाथ - - - - - - - - - - - - -

इतर महत्त्वाच्या बाबी

ठिकाणः नवी मुंबई

सं. पां. देशमुख
उप सचिव, जाहिरात
महाराष्ट्र लोकसेवा आयोग